amir khan in lalsingh chadhdha

एका व्हायरल व्हीडिओत आमिर खान हा ऑरेंज टीशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसत आहे. सध्या आमिर खान या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीमध्ये करत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खानसुद्धा काही दिवसांपूर्वीच शूटिंगसाठी दिल्लीत दाखल झालेली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या आपल्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याचे अनेक अवतार पाहण्यास मिळणार आहे. यात त्याने अनेकवेळा आपला लूक बदलला आहे. या चित्रपटातील एक नवीन लूक सोशल मीडियावर लिक झाला आहे.

 

View this post on Instagram

 

#Leaked Aamir on the sets of #LalSinghChaddha #AamirKhan #KareenaKapoor

A post shared by Bollywood Hungama🎥 (@realbollywoodhungama) on

एका व्हायरल व्हीडिओत आमिर खान हा ऑरेंज टीशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसत आहे. सध्या आमिर खान या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीमध्ये करत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खानसुद्धा काही दिवसांपूर्वीच शूटिंगसाठी दिल्लीत दाखल झालेली आहे. करिना कपूर-खान प्रेग्नेंट असल्याने आता तिचा बेबी बंप दिसू लागला आहे. तिचे अद्याप १०० दिवसांचे शूटिंग बाकी आहे. यामुळे तिचा बेबी बंप दिसू नये यासाठी व्हीएफएक्सूचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटांत विजय सेतुपती आणि मोना सिंहदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अतुल कुलकर्णीद्वारा लिखित आणि अद्वैत चंदन हे दिग्दर्शत करणार आहेत. आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.