अबब ! ब्रम्हास्त्रचं बजेट ‘इतक’; रणबीर आणि आलियाचा आगामी सिनेमा बजेटमुळे चर्चेत

दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपट बजेटमुळे सध्या खूप चर्चेत आहे. या सिनेमाचं बजेट तब्बल ३०० कोटी रूपयांच्यावर गेलं आहे. या सिनेमाला आधीच सर्वात मोठा सिनेमा म्हटलं जात आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होईल असे सांगण्यात येत आहे. मीडियासोबत बोलताना ब्रम्हास्त्रच्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला हा सर्वात मोठा सिनेमा आहे. सिनेमाच्या बजेटवर त्यांनी सांगितले की, ३०० कोटीपेक्षा जास्तच या सिनेमाचं बजेट झाले असेल. मेकर्सना असंही वाटतं की ब्रम्हास्त्र सारख्या सिनेमाचा खरा आनंद थिएटरमध्येच घेतला जाऊ शकतो.

तगडी स्टारकास्ट
रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि अक्किनेनी नागार्जुन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात रणबीर कपूर सुपर हिरोची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा तीन पार्टमध्ये बनवला जाईल.या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीनवर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.