जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा अल्पपरिचय

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  मुंबई: चित्रपटसुष्टी जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी ६ जून रोजी देखील दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं.

  त्याचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता.

  दिलीप कुमार यांचे वडील फळांचे व्यापारी होते, नाशिकच्या देवळाली भागात त्यांचे शिक्षण झाले. वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी ते मुंबईत आले.

  १९४२ साली दिलीप कुमार यांना ‘बॉम्बे टॉकिज’च्या मालकीण देविका राणी यांनी १२५० रुपयांच्या नोकरीचा प्रस्ताव दिला , ही त्यांची पहिली नोकरी होती. तिथूनच पुढे त्यांचा चित्रपट सृष्टीतील करिअरला सुरुवात झाली.

  ‘ज्वारा भाटा’ हा त्यांचा पहिला सिनेमा १९४४ला प्रदर्शित झाला. त्यांनतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेमासृष्टीला दिले.

  बॉम्बे टॉकिज’च्या मालकीण देविका राणी यांनी दिलीप कुमार यांचे चित्रपट सृष्टीतील उज्ज्वल भविष्य ओळखत , प्रेक्षकांशी सहजरित्या जोडले जाईल असे असे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला त्यानंतर त्याचे मूळ नाव मोहम्मद युसुफ खान बदल ते चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले.

  दिलीए कुमार यांना आतापर्यंत ८ वेळा फिल्म फेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याचबरोबर दादासाहेब फाळके व पद्मभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.