ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कारण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

दिलीप कुमार यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

    मुंबई: अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

    अभिनेते दिलीप कुमार यांनी आज सकाळी खारघर येथील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना २९ जून रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
    दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. याच कब्रस्तानमध्ये मोहम्मद रफी,मधुबाला, मजरूह सुल्तानपुरी अन्य अनेक सेलिब्रिटींवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.

    दरम्यान दिलीप कुमार यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.