दिलीप कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘महानायक’ हरपला – छगन भुजबळ

दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीतील इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ट्रॅजडी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.

    मुंबई: भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले असून त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची अपरिमित अशी हानी झाली असून एक कलागुण संपन्न अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो अश्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

    दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीतील इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. सर्वाधिक पुरस्कार जिंकण्यासाठी दिलीप कुमार यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. दिलीप कुमार पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.