कंगना ऑफीस तोडफोड प्रकरणी राऊतांना प्रतिवादी बनविण्याची मागणी

कंगना रणौतच्या मुंबईतील ऑफीसची काही दिवसांपुर्वी तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी उद्या  होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि तोडफोडीच आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी तोडफोड झाल्यानंतर  ‘उखाड डाला’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचे पुरावे कंगनाच्या वकिलांनी  सादर केले . मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलेला दिलासा अजुनही कायम आहे. कंगनाने या तोडफोडीत २ को़टींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

कंगना रणौतने मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असे काही दिवसांपुर्वी म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले. कंगना आणि राऊत यांच्यात तर ट्विटर युद्ध रंगत गेले. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कुणाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे तिने म्हटले होते. कंगना ९ तारखेला मुंबई विमानतळावरुन थेट आपल्या घरी मुंबईतील निवासस्थानी दाखल झाली आहे. कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. याचवेळी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली. याप्रकरणी कंगनाचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर उच्च न्यायालयाने मनपाला कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.