
मुंबई : नॅशनल क्रशचं बिरुद मिरवणारी प्रिया प्रकाश वॉरिअर (Priya Prakash Varrier) आठवतेय का? डोळा मारुन आपल्या दिलखेच अदांनी हजारो तरुणांना घायाळ केले. पण, सध्या ती काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असताना तिने आपला नविन व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. तिचा हा नविन व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमुळे तिचं एक नविन टॅलेंट तिच्या चाहत्यांना पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया ‘चन्ना मेरेया’ हे हिंदी गाणं गाताना दिसत आहे. हॉट रेड कलरच्या साडीत प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे. एका लग्नात प्रियाने हे गाणं गायले आहे.
एक्स्प्रेशन्स प्रमाणे प्रियाचा आवजी तितकाच सुंदर आणि मधुर आहे. तिच्या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळत असून, कॉमेंट्समध्ये चाहते तिच्या आवाजाचं कौतुक करत आहेत.