ananya pande

अभिनेत्री अनन्या पांडेने(ananya pande) आपल्या व्यक्तिरेखा आणि चित्रपटासाठी खूप कौतुक मिळवले आहे. आता अनन्याने आपल्या आगामी ‘खाली पीली’ या चित्रपटाद्वारे अॅक्शन सीन(action scene) करण्याचा प्रयत्न केला आहे.  ‘खाली पीली’चे(khali peeli) अॅक्शन दिग्दर्शक परवेज शेख यांनी सांगितले, अनन्याने बॉडी डबलचा उपयोग न करता, आपल्या अॅक्शन परफॉर्मन्सने संपूर्ण यूनिटला आश्चर्याचा धक्का दिला. अनन्याने परफेक्शनसोबत अॅक्शन सीन्स दिला आणि संपूर्ण यूनिटने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या कारण तो एक अतिशय इंटेन्स सीन होता, असे परवेज शेख यांनी सांगितले.

परवेज या चित्रपटाविषयी म्हणाले की, जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवण्याचे ठरवले तेव्हा ‘खाली पीली’ हा अॅक्शन चित्रपट नव्हता मात्र जसं जसं आम्ही शूटिंग करत गेलो, आम्ही काही अॅक्शन सीक्वेंस करण्याचे ठरवले. अनन्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले की, अनन्याचा एक विशेष अॅक्शन सीन होता.  तो सीन  अनन्या करू शकणार नाही, असे मला वाटले होते. कारण हे दृश्य एक फ्री रनसोबत सुरु होते आणि त्यानंतर एका सिंगल शॉटमध्ये गुंडांवर उडी मारायची होती. जराशा चुकीने खांदा तुटण्याची किंवा मान फ्रॅक्चर होण्याची शक्यता होती. मात्र अनन्याने खरोखरच या सीनमधील तिच्या अॅक्शनने सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला ज्याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये देखील बघता येईल.

ते पुढे म्हणाले, क्लायमॅक्समध्ये आणखी एक अॅक्शन सीक्वेन्स आहे ज्याला एका हार्नेसच्या मदतीने करण्यात येणार होते आणि अनन्याने पुन्हा एकदा परफेक्शनसह अॅक्शन सीन केला आणि संपूर्ण यूनिटने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या.यात तिला उडी मारून गाडीवर स्वत:ला ढकलून द्यायचे होते आणि त्याचवेळी हे देखील पाहायचे होते की गाडीची काच फुटून खाली पडायला हवी आहे. साधारणपणे, बॉडी डबलचा वापर करून हा सीन करता आला असता मात्र अनन्याने ही जबाबदारी आपल्यावर घेतली आणि ती अचूक पार पाडली.

अनन्यासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवांविषयी बोलताना,शेख यांनी म्हणाले की, मी पहिल्यांदाच अनन्या पांडेसोबत अॅक्शनसाठी काम करतो आहे. आम्ही असा विचार केला होता की ती आम्ही डिझाईन केलेले अॅक्शन सीन्स करू शकणार नाही. मात्र, अनन्याने आपल्या प्रदर्शनाने आम्हाला स्तिमित केले आहे.