hritik roshan

अभिनेता ह्रतिक रोशनचे(hritik roshan) लक्ष्य सोशल मिडीयावरील एका २० वर्षीय भारतीय बॅले डान्सर(ballet dancer)साठीच्या निधी संकलनाच्या पोस्टने(fund raising post) वेधले आणि ह्रतिकने क्षणाचाही विचार न करता एका बॅले डान्सरचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.

कमल सिंह असे या बॅले डान्सरचे नाव आहे. तो २० वर्षांचा असून दिल्लीतील विकासपुरीमधील एका ई-रिक्शा चालकाचा मुलगा आहे. तो लंडनमधील एका प्रतिष्ठित इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला भारतीय डान्सर आहे. मात्र, अपुऱ्या पैशांअभावी आपले स्वप्न पूर्ण करण्यास आणि ते वास्तवात आणण्यास त्याला अडथळे येत होते.

कमलचे शिक्षक फर्नांडो गुइलेरा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ह्रतिकला त्याच्या उदारतेबद्दल धन्यवाद दिले. ज्यामुळे कमलला आपले लक्ष्य प्राप्त करणे शक्य होत आहे.

त्यांनी ह्रतिकने केलेल्या मदतीचा एक स्नॅपशॉट शेअर करताना लिहिले की, “Thank you so much @hrithikroshan
@hrxfilms for supporting my student @noddy_singh_official”

 

View this post on Instagram

 

Thank you so much @hrithikroshan @hrxfilms for supporting my student @noddy_singh_official

A post shared by Mario Fernando Aguilera (@fernandoaguileraindiaofficial) on

ह्रतिकच्या सोशल मीडिया टाइम लाइनवर एक नजर टाकली तर ती अशाच कौतुकाच्या अनेक प्रशंसनीय पोस्टने भरलेली दिसेल. मग ते डान्स/सिंगिंग/ मिमिक्री/पेंटिंग सारखी कोणतीही कला असो, त्याच्या प्रोफाइलवरून ते त्यांचासाठी व्यक्तिगत नोट्स/लाइक्स आवर्जून केले जातात.

ह्रतिक टॅलेंट खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतो आणि ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. ह्रतिक कधीच युवा प्रतिभांचे समर्थन करण्यामध्ये कसर सोडत नाही आणि नेहमीच त्यांना प्रेम आणि प्रोत्साहन देतो. योग्य प्रतिभेला पुढे नेण्यास आणि त्यांना त्यांचे क्षितिज प्राप्त करून देण्यात मदद करण्यासाठी ह्रतिकला खऱ्या आयुष्याचा हिरो मानले जाते.