kangana - sushant

कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “काही तरुण आणि असाधारण व्यक्ती फक्त एक दिवस उठून आत्महत्या करते. सुशांतने सांगितले होते की त्याच्यावर अत्याचार केला जात आहे, त्याचा जीव धोक्यात आहे. चित्रपट माफियांनी आपल्यावर बंदी आणली आहे व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्याने केला होता.

मुंबई : सुशांतसिंग राजपूत (Sushant singh Rajput case) याच्या मृत्यूचा एम्स (AIIMS) तज्ञांचा अहवाल समोर आला आहे. अहवालात सुशांतच्या हत्येचा(Sushant Suicide) संशय नाकारला गेला आहे, त्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) ट्विट करुन तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “काही तरुण आणि असाधारण व्यक्ती फक्त एक दिवस उठून आत्महत्या करते. सुशांतने सांगितले होते की त्याच्यावर अत्याचार केला जात आहे, त्याचा जीव धोक्यात आहे. चित्रपट माफियांनी आपल्यावर बंदी आणली आहे व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्याने केला होता. बलात्काराचा खोटा आरोप करून तो मानसिक त्रास देत होते. #AIIMS ”

कंगनाने उपस्थित केले प्रश्न

कंगना रणौतने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये एक-एक करून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

एसएसआर वारंवार मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी बंदी घालण्याविषयी बोलले होते. त्याच्याविरुध्द कट रचणारे हे लोक कोण आहेत?

मीडियाने त्याच्यावर बलात्कारी असल्याची खोटी बातमी का पसरवली?

महेश भट्ट त्यांचे मनोविश्लेषण का करीत होते?

एम्सने खुनाचा आरोप नाकारला

सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणात एम्स डॉक्टरांच्या पॅनेलने सीबीआयला आपले मत दिले की सुशांतच्या हत्येचा पुरावा मिळालेला नाही. आता सीबीआय या प्रकरणात आत्महत्येच्या घटनेबद्दल अधिक चौकशी करेल. रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांच्या पॅनेलने हा सर्व सिद्धांत नाकारला आहे की सुशांतला विष देऊन किंवा गळा दाबून ठार मारण्याचा संशय व्यक केला होता.