अक्षय कुमारला मातृशोक! अरुणा भाटियांचे रुग्णालयात निधन

ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक झाला आहे. त्याची आई अरुणा भाटिया यांचे मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली.

     

    अक्षय कुमारची सोशलमीडियावर भावूक पोस्ट

    “ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती,” अशी पोस्ट त्याने केली आहे.