mumbai Actress accused of raping director

'पॉर्न व्हिडीओ दाखवून आयुष तिवारीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. तो व्हिडीओ कॉल करून आणि आपल्या गुप्तांगाचे फोटोही पाठवत असल्याचे पीडीतेने तक्रारीत म्हंटले आहे. गर्भवती राहिल्यानंतर आयुष याला याबद्दल सांगितले असता त्याने माझ्या चारित्र्यावरच संशय घेऊन मारहाण केल्याचेही तरुणीने पोलिसांना सांगीतले.

मुंबई  : बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्ये (web series actress) काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने दिग्दर्शकावर बलात्काराचा (Rape) आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कास्टिंग दिग्दर्शक आयुष तिवारी याच्याविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पॉर्न व्हिडीओ दाखवून आयुष आपल्यासोबत अत्याचार करत  असल्याचे या अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष देऊन आयपषने तिच्यावर वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतरही त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित तरुणीने 25 नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून आयुष विरोधात बलात्कार आणि फडवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पॉर्न व्हिडीओ दाखवून आयुष तिवारीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. तो व्हिडीओ कॉल करून आणि आपल्या गुप्तांगाचे फोटोही पाठवत असल्याचे पीडीतेने तक्रारीत म्हंटले आहे. गर्भवती राहिल्यानंतर आयुष याला याबद्दल सांगितले असता त्याने माझ्या चारित्र्यावरच संशय घेऊन मारहाण केल्याचेही तरुणीने पोलिसांना सांगीतले.

तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या भावाला सांगीतल्यानंतर त्याने आयुष तिवारीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुष तिवारीने पीडितेला भेटण्यास नकार दिला. अखेरीस पीडितेने वर्सोवा पोलीस स्टेशन गाठून आयुष विरोधात तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप त्याला अटक झालेली नाही.