nawajuddin siddiqui

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची(nawajuddin siddiqui) पत्नी आलियाने काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनवर आरोप केले होते.  आता पुन्हा एकदा तिने नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर आलियाने नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबातील आणखी ४ जणांविरुद्ध बुढाना पोलिसांकडे तक्रार(police complaint) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने याआधी २७ जुलै रोजी मुंबई पोलीसांकडे नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र यावेळी तिने मुजफ्फरनगरमधील बुढाना येथील एका पोलीस स्टेशन गाठले आहे आणि तिथे तक्रार नोंदवली आहे.

आलियाने नवाजुद्दीनला इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवली आहे. आलिया आणि नवाजुद्दीन यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. त्यांना २ मुले आहेत. आलियाच्या या तक्रारीनंतर नवाजुद्दीन काय भूमिका घेईल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.