बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने बजावला समन्स, पुन्हा होणार अर्जून रामपालची चौकशी कारण…

आत्तापर्यंत ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आलीये. दीपिका पदुकोण, सारा अली खान नंतर अभिनेत अर्जून रामपालचीही चौकशी यामध्ये करण्यात आली. आता एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल समन्स बजावलं आहे. एनसीबीने 16 डिसेंबरला अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूड ड्रग कनेक्शन समोर आलं होतं. सध्या एनसीबी याप्रकरणी कसून तपास करत आहे.

अर्जून आणि गर्लफ्रेंडची ही चौकशी

अर्जुन रामपालबरोबर त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची देखील एनसीबीने सलग दोन दिवस ६-६ तासांसाठी चौकशी केली होती. एनसीबीने गेल्या महिन्यात अभिनेता अर्जुन रामपालच्या घराचीही झडती घेतली होती. त्यानंतर अर्जुनला एनसीबीच्या ऑफिसमध्ये बोलावलं होते. झडती दरम्यान एनसीबीला अर्जुनच्या घरी ड्रग्ज सापडले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

 

ड्रायव्हरचीही झाली चौकशी

एनसीबीने अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)