dipika padukon's manager summons

धिकऱ्याने सांगितले की, चितगोपेकर हे 'केडब्ल्यूएएन' टॅलेंट मॅनेजर एजन्सीचे सीईओ आहेत आणि करिश्मा प्रकाश या एजन्सीच्या कर्मचारी आहेत. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी कथितपणे अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) चौकशीसाठी बॉलीवूडच्या ड्रग्ज (Drugs) प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणची ( Deepika Padukone) टॅलेंट मॅनेजर (manager) करिष्मा प्रकाश (Karishma Prakash) आणि टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ (CEO) ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

अधिकऱ्याने सांगितले की, चितगोपेकर हे ‘केडब्ल्यूएएन’ टॅलेंट मॅनेजर एजन्सीचे सीईओ आहेत आणि करिश्मा प्रकाश या एजन्सीच्या कर्मचारी आहेत. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी कथितपणे अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्याची आता चौकशी सुरू आहे.
राजपूतच्या ‘टॅलेंट मॅनेजर’ जया साहा यांनाही एनसीबीने सोमवारी चौकशी केली. अधिकाऱ्याने सांगितले की चौकशी दरम्यान एनसीबीला या प्रकरणातील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कथित भूमिकेविषयी माहिती मिळाली.

दिपिकाने केले होते ड्रग्ज बाबत चॅट

दीपिका : तुमच्याकडे माल आहे का?
करिश्मा : आहे, पण ते घरी आहे. मी वांद्रे मध्ये आहे.
करिश्मा : तुमची इच्छा असेल तर मी अमितला सांगते.
दीपिका : हो, प्लिज
करिश्मा : अमितकडे आहे, तो ठेवतो.
दीपिका : हॅश आहे ना?
दीपिका : गांजा नाही

सुशांतसिंग राजपूतच्या माजी टॅलेंट मॅनेजर जया साहा यांच्याशी या चॅटची माहिती दिली जात आहे. गप्पांमध्ये ‘डी’ आणि ‘के’ नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी म्हणजे दीपिका पादुकोण आणि के म्हणजे करिश्मा.