बुडत्याचा पाय खोलात, दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला एनसीबीचे समन्स, या तारखांना होणार चौकशी

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात आता बॉलिवूडच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या सिनेतारकांचे व्यवस्थापन करणारी एजन्सी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी)(ncb) रडारवर  आहे. या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आले आहे. ही एजन्सी अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित असून दीपिकाचादेखील या प्रकरणाशी संबंध असू शकतो. त्यामुळे आता दीपिका पादुकोण(deepika padukon) , श्रद्धा कपूर(shraddha kapoor) आणि सारा अली खान(sara ali khan) यांना एनसीबीने समन्स(ncb summons) पाठवला आहे. या तिघींना येत्या ३ दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहायला सांगण्यात आले आहे. यात राकूलप्रीत सिंह हिचाही समावेश आहे.

श्रद्धा आणि सारा अली खान हिची चौकशी उद्या होणार आहे, तर दीपिका पादुकोमची चौकशी शुक्रवारी होणार आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही अभिनेत्रींनाही ड्रग्ज प्रकरणी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर एनसीबीनं काही दलालांकडूनही माहिती मिळवण्यास सुरुवात केली. दलालांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीनं सिने क्षेत्रातील अनेक लोकांवर लक्ष केंद्रित केलं आहे.  जया साह रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ देत होती, असं दोघींमधील चॅटमधून समजले. जयाचा संबंध सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एजन्सीशी आहे. त्यामुळे जयाला एनसीबीने समन्स बजावले. शिवाय त्या एजन्सीच्या सीईओंनादेखील आज चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रृती मोदी हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे.

ती एजन्सी ज्यांचे व्यवस्थापन करते त्यात दीपिका पदुकोणचेही नाव आहे. दीपिका  जया व अन्य काहीजणांसोबत अमली पदार्थांसाठी संपर्कात होती, असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे  दीपिकालादेखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनाही एनसीबीने समन्स पाठवला आहे.