pathan movie

आगामी 'पठाण' (Pathan) चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात पहिल्यांदा शाहरुखच्या सोलोचा भाग शूट करण्यात येणार आहे.

बॉलिवूडमधील किंग खान (King Khan) अर्थात शाहरुख खान (Srk) दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात पहिल्यांदा शाहरुखच्या सोलोचा भाग शूट करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी जॉन आणि दीपिकाचे शूटिंग करण्यात येणार आहे. ‘वॉर’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे ‘पठाण’चे दिग्दर्शन करणार आहेत, जे ॲक्‍शन सीनसाठी ओळखले जातात. यामुळे ‘पठाण’मध्येही चाहत्यांना जबदरस्त ॲक्‍शन पाहण्यास मिळणार आहेत. या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगायचे झाल्यास हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीला रिलीज करण्यात येणार आहे. बिग बजेट असलेला हा चित्रपट निर्मात्यांनी सणासुदीला प्रदर्शित करण्याचे निश्‍चित केले आहे. दरम्यान, या चित्रपटात शाहरुख-दीपिका पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यात जॉन अब्राहमही एका खास भूमिकेत चाहत्यांना भेटीस येणार आहे.