Refusing the minister for dinner cost actress Vidya Balan dearly; Shooting of 'Lioness' movie stopped

शूटिंग सुरू असतानाच वनमंत्री शाह यांनी विद्या बालन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजताची वेळही ठरविण्यात आली. सायंकाळी पाच वाजता ते विद्या बालन यांची भेट घेण्यास गेले व भेटीनंतर डिनरचे निमंत्रण दिले. तथापि विद्या बालन महाराष्ट्रातील गोंदिया येथे थांबल्या होत्या त्यामुळे त्यांनी डिनरला नकार दिला. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा दैनंदिन कार्यक्रमानुसार शूटिंगसाठी सरसावले तेव्हा मात्र डीएफओ जी.के. बरकडे यांनी युनिटच्या गाड्या रोखल्या.

गोंदिया :  मध्यप्रदेशचे वनमंत्री विजय शाह(vijay shah) यांनी दिलेले डिनरचे निमंत्रण फेटाळणे अभिनेत्री विद्या बालनसाठी(vidya balan) अडचणीचे ठरले. डिनरला नकार दिल्यानतंर दुसऱ्याच दिवशी डीएफओने चित्रपटाचे शूटिंग करीत असलेली वाहने रोखली. तथापि जेव्हा याची कुणकुण वरपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र सर्व तिढा सुटला. विद्या बालन चित्रपट ‘शेरनी’च्या शूटिंगसाठी बालाघाटला आली असता हा प्रकार घडला. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी २० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परवानगी घेण्यात आली होती.

शूटिंग सुरू असतानाच वनमंत्री शाह यांनी विद्या बालन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजताची वेळही ठरविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता वनमंत्र्यांना महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यावयाची होती व तेथेच त्यांना रात्री मुक्कामही करावयाचा होता. परंतु त्यांनी भरवेली येथील खाण गेस्ट हाऊसमध्येच मुक्काम केला.

सायंकाळी पाच वाजता ते विद्या बालन यांची भेट घेण्यास गेले व भेटीनंतर डिनरचे निमंत्रण दिले. तथापि विद्या बालन महाराष्ट्रातील गोंदिया येथे थांबल्या होत्या त्यामुळे त्यांनी डिनरला नकार दिला. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा दैनंदिन कार्यक्रमानुसार शूटिंगसाठी सरसावले तेव्हा मात्र डीएफओ जी.के. बरकडे यांनी युनिटच्या गाड्या रोखल्या. वन विभागाच्या या कारवाईची माहिती वरपर्यंत पोहोचताच डीएफओला निर्देश देण्यात आले आणि त्यानंतर शूटिंग पूर्ववत सुरू झाले.

याबाबत चीफ कंझर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट (सीसीएफ) नरेंद्रकुमार सनोडिया यांनी ते स्वत: मंत्र्यांसोबत होते असे सांगितले. तथापि डिनरच्या निमंत्रणाबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी डीएफओने काही गाड्या रोखल्या होत्या परंतु पीएसने तत्काळ फोन करून डीएफओ यांना राज्यात चित्रपटाचे शूटिंग कमी प्रमाणात होते असा दाखला देत शूटिंग रोखले तर राज्याची बदनामी होईल असे सांगितले व त्यानंतरच शूटिंग पुन्हा सुरू झाले.

मंत्र्यांची सारवासारव

दुसरीकडे, वनमंत्री शाह यांनी डिनरचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले होते असा दावा केला. शूटिंगवेळी जंगलात दोन जनरेटर जात असतात. परंतु त्या दिवशी जनरेटर असलेल्या अनेक गाड्या नेण्यात आल्या त्यामुळेच डीएफओने या गाड्या रोखल्या असा दावाही त्यांनी केला.