ritesh deshmukh in kbc

कौन बनेगा करोडपती या शोचा नवा सीजन सुरू झाला आहे. केबीसीच्या करमवीर या स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनचे संस्थापक आणि मॅनेंजिग ट्रस्टी डॉ. सुनील श्रॉफ आले. मोहन फाऊंडेशन गेल्या २ दशकांपासून अवयवदानासंदर्भात काम करत आहेत. याच एपिसोडमध्ये आणखी एक खास चेहरा दिसला तो म्हणजे बॉलिवूड स्टार रितेश देशमुख याचा. श्रॉफ याच्यासोबत सेलिब्रेटी गेस्ट म्हणून रितेश देशमुख केबीसीच्या हॉटसीटवर बसून खेळ खेळला. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी अलिकडेच अवयवदानाचा संकल्प केला होता.

केबीसीच्या या एपिसोडमध्ये रितेश या संकल्पमागचा उद्देश सांगताना दिसणार आहे. यावेळी वडिलांच्या आठवणीने रितेश भावूक झाल्याचे दिसून आले(ritesh deshmukh turn to emotional on kbc sate). रितेश देशमुखने वडिलांचा म्हणजेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा उल्लेख केला. यावेळी तो इमोशनल झाला. त्यावेळी अवयव दान केले असते तर कदाचित वडिलांना वाचवता आले असते असे रितेश म्हणाला. काहीतरी केले पाहिजे असे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात होते. जिवंतपणी मी माझ्या वडिसांसाठी काही करू शकलो नाही त्यामुळे मी माझे शरीर तंदुरुस्त ठेवतो असेही रितेश म्हणाला. सध्या खूप कमी अवयव दाता आहेत.

अगदी गंभीर परिस्थिती असेल तर एखादा रिसिपंट या यादीत वरच्या स्थानावर येतो असेही त्याने नमूद केले. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील काही दिवसांपूर्वी अवयव दान करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी देखील ट्विट करून याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.