salman khan

सलमान खानने(salman khan) नुकताच आपला ब्रँड ‘बीइंग स्ट्रॉन्ग’(being strong) चा परिचय करून दिला होता. आता सलमानने आपले युट्यूब चॅनलवर(youtube channel) एक व्हिडीओ(video) प्रदर्शित केला आहे. हा सलमानचा खास व्हिडिओ फिट राहण्यासाठी वेट लिफ्टिंग आणि जिम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक होणार आहे.

या व्हिडिओमध्ये स्मिथ मशीनच्या सेट अप सोबत टाइम लॅप्स मशीनवर एका केबल क्रॉसचे मिश्रण दाखवण्यात आले आहे. सलमान यावर अनेक प्रकारचे वर्क आउट एक्सरसाइजेस करताना दिसत आहे.  वॉर्मिंग फॉर शोल्डर रोटेटर कफ, साइड लेटरल राइजिंग, रोइंग, लॅट्स पुल डाउन, चेस्ट पुल डाउन, हॅमस्ट्रिंग स्ट्रीच, सिंगल लेग बेंच प्रेस, वेट लेग प्रेस अशा व्यायामांचा यामध्ये समावेश आहे.

व्हिडिओच्या शेवटी, सलमानच्या स्नायूंमध्ये पडलेला फरक पाहू शकतो कारण प्रत्येक एक्सरसाइजमध्ये टप्प्याटप्प्याने त्यावर काम करण्यात आले आहे. सलमानने निश्चितपणे लॉकडाऊनचा सर्वात चांगला उपयोग केला आहे. पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियावर एक मोठा आणि विस्तृत व्हिडीओ टाकला आहे.