sanjay dutt and manyata

मुंबई : अभिनेता संजय दत्तला(sanjay dutt) ११ ऑगस्ट रोजी फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आला. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त मुंबईतून परदेशात अचानक गेले आहेत.

संजय दत्त आपली पत्नी मान्यतासह मंगळवारी संध्याकाळी दुबईला(dubai) रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या मुलांना भेटण्यासाठी संजय दत्त दुबईला गेले असल्याचे समजते. पुढचे ८-१० दिवस ते दुबईतच राहणार आहेत. त्यानंतर ते मिंबईत येतील.

संजय दत्त यांनी स्वत: सोशल मीडियावर आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे जाहीर केले होते. त्याना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  कर्करोगाचे निदान झाल्यानंतर संजय दत्त यांनी कामातून थोडा ब्रेक घेतला आहे. संजय दत्त आता जास्त काळ आपल्या तब्येतीकडे लक्ष देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.