sona mahapatra and kangna ranawat

सोनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंगनाने आजपर्यंत कधीही स्वत:चा काही फायदा असल्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी आवाज उठवलेला नाही. कंगना स्वार्थी प्रवृत्तीची आहे. ती तिचा फायदा असल्याशिवाय कोणासाठी काही करत नाही. ज्या लोकांनी तिला पाठिंबा दिला त्यांना ती विसरली आहे. तिने फक्त इंडस्ट्रीमधील वाईट गोष्टींवर भाष्य करण्याचे धाडस केले आहे.

अभिनेत्री कंगना रणौत(kangan ranawat) वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे खूप चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकारवर तिने खूप आरोप केेले आहेत. तसेच बॉलिवूडवर ती कायम टीका करत असते. कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला तर सॉफ्ट पॉर्नस्टार म्हंटलं होतं.जर उर्मिला सॉफ्ट पॉर्नस्टार असताना तिला तिकीट मिळू शकते तर मला का नाही मिळणार ? असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या वक्तव्यांवर गायिका सोना मोहापात्राने(sona mahapatra) आपले मत व्यक्त केले आहे.

सोनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंगनाने आजपर्यंत कधीही स्वत:चा काही फायदा असल्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी आवाज उठवलेला नाही. कंगना स्वार्थी प्रवृत्तीची आहे. ती तिचा फायदा असल्याशिवाय कोणासाठी काही करत नाही. ज्या लोकांनी तिला पाठिंबा दिला त्यांना ती विसरली आहे. तिने फक्त इंडस्ट्रीमधील वाईट गोष्टींवर भाष्य करण्याचे धाडस केले आहे.

याआधीसुद्धा सोनाने कंगनावर निशाणा साधला होता. मात्र कंगनाने तिला ब्लॉक केलं होतं.