काही वर्षांपूर्वी अवघे ५५०० रुपये घेऊन मुंबईत आला होता सोनू सूद, आज आहे १३० कोटींचा मालक

सोनू सूद आपल्या परिवारासह अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पेल्कसमध्ये २६०० स्क्वे. फुटांच्या फोर बीचकेमध्ये राहतो. यासह मुंबईच्या आसपास त्याचे दोन फ्लॅट्स आहेत. त्याचे मूळ गाव मोगा येथे त्याचा बंगलाही आहे. जुहूत त्याचे एक हॉटेलही आहे. याच हॉटेलमध्ये लॉकडाऊनच्या काळात त्याने आयसोलेशन सेंटर केले होते.यासह सोनूच्या कार कलेक्शनमध्ये ६६ लाखांची मर्सिडिज बेन्झ एमएल क्लास ३५० सीडीआय, ८० लाखांची ऑडी क्यू ७ आणि २ कोटी रुपयांची पोर्श पनामाही सामील आहे.

    मुंबई : अभिनेता, कोरोना काळात अनेक गरिबांचा मसीहा अशी प्रतिमा असलेला सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे अचानक चर्चेत आला आहे. आयकर विभागाची कारवाई, कारण आणि त्या मागील राजकारण याची चर्चा रंगली असली, तरी सोनू सूदच्या संपत्तीबाबत मात्र देशभरात उत्सुकता वाढली आहे. तुम्हाला माहित नसेल, पण काही वर्षांपूर्वी अवघे ५,५०० रुपये घून मुंबईत दाखल झालेल्या सोनू सूदची आज ४८ व्या वर्षी १३० कोटींची मालमत्ता आहे.

    एका अहवालाच्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२१ रोजी सोनू सूदची एकूण संपत्ती १३० कोटी रुपये म्हणजेच १७ मिलियन डॉलर्स आहे. सोनू सध्या पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहतो. हिंदी, तेलगू, तामीळ, कन्नड आणि पंजाबी सिनेमातील अभिनेता म्हणून सोनू सूद परिचित आहेत. ब्रँड एन्डोर्स्मेंट हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.

    एका चित्रपटात काम करण्यासाठी सोनू सूद २ कोटी रुपये घेतो. त्याचे स्वताचे प्रोडक्शन हाऊसही असून, त्याचे नाव शक्ती सागर प्रॉडक्शन असे आहे. हे प्रॉडक्शन हाऊस त्याच्या वडिलांच्या नावावर आहे. सोनूने आत्तापर्यंत ७० चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.सिनेमातील कामे आणि ब्रँड एन्डोर्समेंट यातून सोनू दर महिना १ कोटी रुपये कमवतो, म्हणजेच वर्षाला १२ कोटी ही त्याची कमाई आहे