‘स्त्री’ चित्रपटाची आता जपानवारी

‘स्त्री’(stree) हा हॉरर आणि कॉमेडीचे खूप चांगले मिश्रण असलेला चित्रपट(movie) भारतामध्ये खूप गाजला. आजही अनेकजण या चित्रपटातील दृश्य आणि संवादांच्या प्रेमात आहेत. या चित्रपटामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि श्रद्धा कपूर यांच्या मूख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची लोकप्रियता भारतात होतीच मात्र आता या चित्रपटाने थेट जपान गाठले आहे. जपानमधील एका चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. श्रद्धा कपूरने (shraddha kapoor) ट्विटरवर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.

श्रद्धाने ट्विटमध्ये स्त्री चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन त्यासोबत असे लिहिले आहे की, स्त्री जपान जिंकण्यासाठी सज्ज. आज जपानमध्ये प्रदर्शित होणार. सावध राहा.

‘स्त्री’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटामुळे श्रद्धा आणि राजकुमार यांना खूप लोकप्रियता मिळाली. आता जपानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने ‘स्त्री’ चित्रपटाच्या आणि त्यातील कलाकारांच्या लोकप्रियतेत भर पडेल, हे निश्चित.