महानायक अमिताभ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

महानायक अमिताभ बच्चन यांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली असून आज त्यांना  रुग्नालयातून मिळाला डिस्चार्ज मिळाला आहे. अमिताभ बच्चन मागील   २३ दिवसांपासून  मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचा  कोरोना रिपोर्ट  निगेटिव्ह आल्याने त्यांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबबातची माहिती  अभिषेक बच्चनने ट्विट करत  दिली आहे. ११ जुलै रोजी अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली होती  . त्यानंतर त्याच दिवशी डॉक्टारांच्या सल्ल्यानुसार त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 

“माझ्या वडिलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरी राहून आराम करतील. तुम्हा सर्वांच्या  प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार’’, असं ट्विट अभिषेकने केलं.

 

दरम्यान , अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय बच्चन, आराध्य बच्चन यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.  या तिघांनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आले होते. ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन यांचा  कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आज अमिताभ यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले. अभिषेक बच्चन अजूनही रुग्णालयात आहे.