सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : CBIकडून रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई :केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) आपल्या हातात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाचा तपास हाती घेताच अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)सह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहाजणांमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रियाची आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती,श्रुती मोदी , सुशांत आणि रियाचा मित्र सॅम्युअल मिरांडा, यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

 

मागील काही दिवसांपासून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा याबबाबतची शिफारस बिहार सरकारसह अनेकजणांकडून करण्यात येत होती .अखेर बिहार सरकारची शिफारस  केंद्र सरकारने मंजूर केली . सध्या या प्रकरणी  सीबीआयने तपास सुरू केला असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.