deepika and ranveer

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जबाबत चॅट एनसीबीच्या तपासात सापडले आहेत. त्यामुळे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाच्या चौकशीदरम्यान तिचा पती रणवीर सिंह याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या (CBI) तपासात ड्रग्ज (Drugs) कनेक्शन बाबत खुलासा झाला. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (rhea chakraborty)  तिचा भाऊ आणि ड्रग पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने  (NCB)केलेल्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika padukone), सारा अली खान, श्रद्धा कपूर, आणि रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख झाला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जबाबत चॅट एनसीबीच्या तपासात सापडले आहेत. त्यामुळे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. दीपिकाच्या चौकशीदरम्यान तिचा पती रणवीर सिंह याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. त्यासाठी रणवीरने एनसीबीकडे स्पेशल अर्ज करुन परवानगी देण्याची मागणी केली आहे.

अभनेता रणवीरने अर्जात असे म्हटले आहे की, दिपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. कारण दीपिकाला कधी कधी पॅनिक अटॅक येतात व भीती देखील वाटते. त्यामुळे चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी असे रणवीने अर्जात म्हटले आहे. परंतु नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) रणवीरच्या अर्जावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.