tiger shroff

अभिनेता टायगर श्रॉफ(tiger shroff) अनेक कलांमध्ये निपूण आहे, याचा प्रत्यय लवकरच प्रेक्षकांना येणार आहे. आतापर्यंत आपल्या अॅक्शन आणि डान्सने मंत्रमुग्ध करणारा टायगर, आता प्रेक्षकांसमोर आपला एक नवा पैलू उलगडणार आहे. लवकरच तो नवे गाणे ‘अनबिलिवेबल’ च्या माध्यमातून गायक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. या गाण्याचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरने सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मोशन पोस्टरमध्ये टायगर हातात माईक घेऊन उभा आहे आणि आकर्षक पार्श्वसंगीत सुरू आहे. हे गाणे ‘अनबिलिवेबल’ टायगरद्वारे लॉकडाऊनच्या दरम्यान बनवण्यात आले आहे. बिग बँग म्यूजिकच्या सहकार्याने, टायगरने हा ट्रॅक सादर केला आहे – #YouAreUnbelievable

या ट्रॅकचे लेखन डी जी मायने आणि अवितेश यांनी केले आहे. टायगरने आपला आवाज दिला आहे. पुनीत मल्होत्राने या गाण्याचे दिग्दर्शन केले असून परेशने कोरियोग्राफी केली आहे.‘अनबिलिवेबल’ बिग बँग म्यूजिकद्वारे निर्मित आहे ज्यात टायगर पहिल्यांदाच आपल्या चालीवर नाचताना आणि गाताना दिसणार आहे. या गाण्याचा टीजर लवकरच प्रदर्शित होणार आहे.