Veteran actor Dilip Kumar behind the scenes of time; He took his last breath at the age of 98 nrpd | दिग्गज अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड ; ९८वर्षी घेतला अखेरचा श्वास | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJuly, 07 2021

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड ; ९८वर्षी घेतला अखेरचा श्वास

द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
12:55 PMJul 07, 2021

मी आज माझा भाऊ गमावला - अभिनेता धर्मेंद्र

मी आज माझा भाऊ गमावला आहे, त्याच्या आठवणी कायम माझ्या हृदयात काय जिवंत ठेवेन - अभिनेता धर्मेंद्र

 

11:37 AMJul 07, 2021

चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला -छगन भुजबळ

भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले असून त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला आहे. दिलीप कुमार हे रतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीतील इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. - छगन भुजबळ,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री 

https://www.navarashtra.com/bollywood-news-marathi/deep-kumar-kumar-nirdhast-mahanayak-lost-chhagan-bhujbal-nrpd-152071/

11:23 AMJul 07, 2021

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाचे मनस्वी दुःख

आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून बॉलीवूडच नाही तर जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते  @TheDilipKumar  यांच्या निधनाने वृत्त ऐकून आपणाला मनस्वी दुःख झाले आहे.त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख

 

11:10 AMJul 07, 2021

रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

10:58 AMJul 07, 2021

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

'चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार यांची कायम आठवण काढली जाईल. दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर, मित्रांबरोबर आणि असंख्य प्रशंसकांसोबत आहेत, देव त्यांच्या आत्मास शांती देवो  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

08:35 AMJul 07, 2021

दिलीपकुमार जी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली

दिलीपकुमार जी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली , भारतीय चित्रपटसृष्टीतले त्यांचे अतुलनीय  योगदान पुढच्या पिढ्यांच्या  लक्षात राहिल. - राहुल गांधी

 

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून असंख्य चाहते व बॉलीवूड कलाकार त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ रविवार
रविवार, जुलै २५, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.