laxmmi bomb

अक्षय राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी बॉम्बमध्ये किन्नरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी होण्यासाठीचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. त्याचवेळी अक्षयचे चाहते त्याला या वेगळ्या पात्रात पाहून खूप खुश आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर ( #LaxmmiBombTrailer)  रिलिज झाला आहे. ट्विटरवर ट्रेलर पोस्ट करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, तुम्ही जिथेही असाल तिथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर (Laxmmi) पाहण्यास सज्ज व्हा. कारण लक्ष्मी येतेय तुमच्या मनोरंजनाला. हा ट्रेलर #LaxmmiBomb ट्विटरवर ट्रेंड करत आहे. यावर लोकांचे वेगवेगळे प्रतिसाद आणि कमेंट येत आहेत. चाहत्यांना ट्रेलर खुप आवडला आहे. तसेच मीमर्सनी या ट्रेलरवर विनोदी मीम्स देखील बनवले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कॉमेडी हॉरर तमिळ चित्रपट ‘मुन्नी २: कांचना’ चा रीमेक आहे. अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पूर्णपणे वेगळ्या पात्रात दिसणार आहे.

अक्षय राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी बॉम्बमध्ये किन्नरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी होण्यासाठीचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. त्याचवेळी अक्षयचे चाहते त्याला या वेगळ्या पात्रात पाहून खूप खुश आहेत.

अक्षय आणि कियाराशिवाय तुषार कपूर आणि शरद केळकर हेही लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात दिसणार आहेत. मी सांगते, कांचना हा तमिळ चित्रपट सुपरहिट होता.