ड्रग्ज प्रकरणात ‘या’ मंत्रीपुत्रास अटक

आदित्य अल्वा हा आपल्या इतर दोन साथीदारांसह चेन्नईमध्ये होता. दोन्ही साथीदार त्याला घरातील कामात मदत करत असत. अहवालानुसार आदित्य अल्वा ज्या घरात चेन्नईमध्ये राहत होता, तेथून तो अद्याप बाहेर पडलेला नव्हता आणि तो तेथेच भूमिगत होता.

बंगळुरू: कर्नाटकचे माजी मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अल्वा याला सोमवारी सँडलवुड ड्रग प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेंगळुरू पोलिस गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली. सप्टेंबर २०२० मध्ये सँडलवूड ड्रग्स प्रकरणात त्याचे नाव आले असल्याने आदित्य अल्वा फरार होता. यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात दाखल केलेला एफआयआरही रद्द करावा लागला.आदित्य अल्वा हा आपल्या इतर दोन साथीदारांसह चेन्नईमध्ये होता. दोन्ही साथीदार त्याला घरातील कामात मदत करत असत. अहवालानुसार आदित्य अल्वा ज्या घरात चेन्नईमध्ये राहत होता, तेथून तो अद्याप बाहेर पडलेला नव्हता आणि तो तेथेच भूमिगत होता.