होम लोन घेणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठा दिलासा; एका वर्षाच्या व्याजावर दीड लाखांची सुट मिळणार

होम लोन घेणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. परवडणाऱ्या घरांवरील व्याज मर्यादेतील सूट वाढवण्यात आली आहे. एका वर्षाच्या व्याजावर दीड लाखांची सुट मिळणार आहे.

दिल्ली : होम लोन घेणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. परवडणाऱ्या घरांवरील व्याज मर्यादेतील सूट वाढवण्यात आली आहे.

ही सूट एक वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. परवडणारी घरं आणि भाड्याच्या घरांवर जुलै २०१९ मध्ये १.५ लाख व्याजावर करात सूट देण्यात आली आहे. घर खरेदी करताना जी कर्ज २०२२ पर्यंत घेतली जाणार आहेत. त्यावरही ही सुविधा मिळणार आहे.

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत घर मिळावं यासाठी सेक्शन 80EEA अंतर्गत २०१९ च्या अर्थसंकल्पात संबंधित नियम लागू केला होता.

या अंतर्गत इंट्रेस्ट रीपेमेंटवर १.५ लाख रुपयांची वेगळी सूट मिळते. विशेष म्हणजे ही सूट सेक्शन २४ बी पेक्षा वेगळी आहे. या संदर्भातील काही अटीशर्थींची पुर्तता केल्यावर होम लोन घेणारे या योजनेचा लाभ घेवू शकतात.