केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी केली खास घोषणा, लेह आणि लडाखला काय दिलं ?

लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाणार असून देशात १०० नव्या सैनिकी शाळा तयार करण्यात येणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीरसाठी एक नवा गॅस पाईपलाइन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. अशा प्रकारे लेह आणि लडाखला केंद्र सरकारने खास घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (सोमवार) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखसाठी मोठी घोषणा केली आहे. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाणार असून देशात १०० नव्या सैनिकी शाळा तयार करण्यात येणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीरसाठी एक नवा गॅस पाईपलाइन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. अशा प्रकारे लेह आणि लडाखला केंद्र सरकारने खास घोषणा केली आहे.

सोलर एनर्जी कॉरपोरेशनसाठी १ हजार कोटी रुपये आणि नुतनीकरण ऊर्जा विकास एजन्सीसाठी १ हजार ५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. देशात चांगल्या रोजगारासाठी कौशल विकास तथा प्रशिक्षणाच्या दृष्टीने तरुणांना तयार करण्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम सुरू केली जाईल. तसेच, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत इतरही प्रकल्प सुरू केले जातील.

नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील तरतुदीनुसार, हायर एजुकेशन कमीशनची स्थापना करण्यात आली आहे. हे देशातील उच्च शिक्षणाचे एकमेव नियामक असेल.