अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार; ग्राहकांना वीज कंपनी निवडण्यासाठी पर्याय मिळणार

वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. आता ग्राहकांना वीज कंपनी निवडण्यासाठी पर्याय मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली.

दिल्ली : वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. आता ग्राहकांना वीज कंपनी निवडण्यासाठी पर्याय मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली.

अपारंपरिक ऊर्जाक्षेत्राला चालना देण्यासाठी सौर ऊर्जा महामंडळासाठी १,००० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. नवीकरणीय ऊर्जा विकास यंत्रणेसाठी १,५०० कोटीच्या निधीची घोषणा करण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऊर्जा क्षेत्रासाठीही घोषणा केली आहे. सरकारकडून ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची योजना लॉन्च केली जाणार आहे. जी देशात विजेशी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम करेल.

सरकारकडून हायड्रोजन प्लांट बनवण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रात PPP मॉडेल अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. भारतात मर्चंट शिप्सना प्रोत्साहन देण्यासाठी काम केलं जाईल. सुरुवातीला यासाठी १६२४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय गुजरातमधील प्लांटद्वारे शिप रिसायकल करण्यावर काम केलं जाईल.