cash

दिवळखोरीमुळे सध्या अनेक बँका देशोधडीला लागल्या आहेत. यामुळे बँक खातेदारांना आर्थिक  अडचणींचा सामना करावा लागतो. यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. बँक बुडाली तरी खातेदारांना पाच लाख रुपये मिळणार आहेत.

मुंबई : दिवळखोरीमुळे सध्या अनेक बँका देशोधडीला लागल्या आहेत. यामुळे बँक खातेदारांना आर्थिक  अडचणींचा सामना करावा लागतो. यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. बँक बुडाली तरी खातेदारांना पाच लाख रुपये मिळणार आहेत.

बुडालेल्या बँकांच्या कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारने विम्याची रक्कम १ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यामुळे ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवले तर 5 लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे बँका बंद झाल्यावर ग्राहकांचे नुकसान भरून काढता येणार आहे.

याआधी बँकेत ठेवलेल्या पैशांवर एक लाखाचा विमा मिळत होता. आता या विम्याची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे बँक बुडाली तरी खातेदारांना दिलासा मिळणार आहे.

अर्थसंकल्पात बँकांच्या पुनर्पूंजीकरणासाठी २० हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकार बँकांना २० हजार कोटींचे भांडवल देणार आहे.