भारताला निर्यातदार देश बनवण्याची योजना; अर्थसंकल्पात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क लाँच करण्याची घोषणा

बजेट २०२०-२०२१ मध्ये उद्योग क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशात सात टेक्स्टाईल पार्क बनवले जातील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली.

दिल्ली : बजेट २०२०-२०२१ मध्ये उद्योग क्षेत्राबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशात सात टेक्स्टाईल पार्क बनवले जातील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली.

या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातुन या क्षेत्रात भारताला निर्यातदार देश बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे पार्क तीन वर्षात पूर्ण केली जातील अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

यासाठी सात मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क लाँच केले जाणार आहेत. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या ३ वर्षात हे काम पूर्ण होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट (DFI) अतंर्गत तीन वर्षांच्या आत ५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. रेल्वे, NHAI, एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे आता अनेक प्रकल्प आपल्या स्तरावर मंजूर करण्याचे अधिकार असतील.