
दुपारपर्यंत शेअर बाजारात सेन्सेक्स ७०० अंकांपर्यंत होते. परंतु आता बाजार बंद होतानाही पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे चित्र दिसत आहे. तर निफ्टीही ६४६ अंकांनी वधारला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सहा लाख कोटींची भर पडली आहे.
मुंबई: अर्थसंकल्पामुळे भांडवली बाजारात सेन्सेक्सने आता जवळपास २००० अंकाची उसळी घेतली आहे. दुपारपर्यंत शेअर बाजारात सेन्सेक्सने ७०० अंकांपर्यंत होते. परंतु आता बाजार बंद होतानाही पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे चित्र दिसत आहे. तर निफ्टीही ६४६ अंकांनी वधारला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सहा लाख कोटींची भर पडली आहे. परंतु असेच सकारात्मक वातावरण राहिले तर निफ्टी सुद्दा विक्रमी टप्पा ओलांडू शकतो.
बाजाराची स्थिती नेमकी काय?
मुंबई शेअर बाजारात आज एकूण ३ हजार १२९ कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार झाले. यापैकी १,९४६ समभागांचे भाव वधारले होते. २०३ समभागांच्या किंमतीत फरक पडला नाही. तर ९८० कंपन्यांच्या समभागांचा भाव घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ७ पैशांनी खाली घसरला.