बुलढाण्यात १०३ अहवाल पॉझिटिव्ह; ४३४ निगेटिव्ह

  • ८१ रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलढाणा (Buldhana).  जिल्ह्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या आणि रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४३४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १०३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ८६ व रॅपिड टेस्टमधील १७ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २९७ तर रॅपिड टेस्टमधील १३७ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४३४ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज ८१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

आजपर्यंत २६,४१९ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ४७२६ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. १५७९ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २६,४१९ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ५९५१ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ४७२६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ११५० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ७५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.