महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात १५५ जणांना कोरोनाची लागण; कोरोनाचे नियम न पाळल्यास काय होऊ शकतं, याचं मोठं उदाहरण

कोरोनाचे नियमांची पायमल्ली करण किती महागात पडू शकत याची प्रचिती देणार धक्कादायक वास्तव बुलडाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात तब्बल १४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

    बुलडाणा : कोरोनाचे नियमांची पायमल्ली करण किती महागात पडू शकत याची प्रचिती देणार धक्कादायक वास्तव बुलडाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात तब्बल १४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

    काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातूनच गावात कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    या कार्यक्रमात कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. यामुळे संसर्ग पसरला आणि पाहता पाहता गावातील १५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

    या गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आरोग्य पथक, महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आहे. घराघरात जाऊन गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

    या गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारांच्या जवळपास आहे. त्यापैकी १५५ जणांवना कोरोना झाला आहे. आणखी काही ग्रामस्थ कोरोना पॉझिटीव्ह येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.