जिल्ह्यात १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

  • ३९८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
  • 41 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा. (Buldhana) शहरात १५ संशयीत व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात कोरोनाचे १६७ रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३९८अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १६७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १५५ व रॅपिड टेस्टमधील १२ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २७० तर रॅपिड टेस्टमधील १२८ अहवालांचा समावेश आहे. अशा प्रकारे ३९८ अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवालांमधे चिखली शहर : १२, चिखली तालुका: धोत्रा भानगोजी १, गोदरी १, महिमळ १, भरोसा १, खंडाळा मकरध्वज १, हरणी २, येवता २, मालगणी १, सावरगाव बु १, अमोना १, मंगरूळ नवघरे १, नांदुरा शहर : १८, नांदुरा तालुका : जवळा बाजार १, निमगाव १, मोताळा तालुका : इब्राहिमपूर २, धामणगाव बढे १, शेलापुर १, मोताळा शहर २, मलकापूर शहर १३, मलकापूर तालुका : दाताळा २, वडजी १, खामगाव शहर : १८, खामगाव तालुका : घाटपुरी १, शिरला नेमाने २, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे १, जळगाव जामोद शहर : १, मेहकर तालुका : देऊळगाव सकर्षा १, ब्रह्मपुरी १, कनका १, घाटबोरी १, डोणगाव २, गोहेगाव १, मेहकर शहर : ४, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही २, दोड्रा ६, सुरा ६, पांगरी २, धोत्रा १, देऊळगाव राजा शहर : ११, सिंदखेड राजा तालुका : राहेरी बु १, तढेगाव २, सावरखेड नजिक १, गुंज १, साखरखेर्डा ४, लोणार तालुका : सुलतानपूर १, सावरगाव मुंढे २, बुलडाणा तालुका : देऊळघाट २, चांडोळ ३, भादोला १, दुधा १,

आज ४१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत २९, २२२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ५४७२ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ९७१ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २९, २२२ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ६७७० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ५४७२ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात १२१४ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज पर्यंत ८४ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.