भुमराळा घरफोडीच्या घटनेत ७० हजाराचा ऐवज लंपास

लोणार (Lonar).  बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा येथे 13 च्या मध्यरात्री अशोक आनंदराव सानप यांच्या राहत्या घरी चोरांनी चोरी करुन 70 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. धान्य, सोन्या चांदीचे दागिने यांचा त्यात समावेश आहे.

लोणार (Lonar). बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा येथे 13 च्या मध्यरात्री अशोक आनंदराव सानप यांच्या राहत्या घरी चोरांनी चोरी करुन 70 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. धान्य, सोन्या चांदीचे दागिने यांचा त्यात समावेश आहे.

दुस-या घटनेत देवानंद सानप यांच्या राहत्या घरी चोरटय़ांनी मोर्चा वळवला. त्यांच्या घराच्या मागच्या दरवाजाचे कुलूप तोडले व दरवाजा उघडला. शेजारी राहत असलेले त्यांचे चुलत भाऊ डॉ.नारायण सानप यांचा मुलगा विशाल रात्री अभ्यास करत होता. कुलूप तोडल्याचा भास त्याला झाला. विशालने देवानंद सानप यांना फोन करून माहिती दिली की तुमच्या घरामागे चोर आहेत. देवानंद सानप यांनी शेजा-यांसह चोरांचा पाठलाग केला; परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती बीबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार एल.डी. तावडे यांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

तपासासाठी बुलडाणा येथील ठसे तज्ञ व श्वान पथकला बोलावले होते. पोलिसांना काही अंतरावर साहित्य फेकलेले दिसले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक सादीक, कॉन्स्टेबल कलीम देशमुख व पोकॉ मोहम्मद परसुवाले तपास करीत आहेत.