महिला पोलीस कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले

    बुलढाणा (Buldhana) : भरधाव ट्रकने महिला पोलीस कर्मचाऱ्यास (A female police officer) चिरडल्याची (crushed by a truck) घटना ६ सप्टेंबर रोजी सकाळी बुलढाणा चिखली (Buldhana Chikhali) मार्गावर सुंदरखेड परिसरात घडली. गीता बामंदे (Geeta Bamande) असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    एलसीबीमध्ये कार्यरत असलेल्या गीता बामंदे या चिखली रोडने ६ सप्टेबर रोजी सकाळी जात होत्या. यावेळी भरधाव ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी धाव घेउन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध (the truck driver) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.