कोविड रुग्णांसाठी १० दिवसात ४० बेडची अतिरिक्त व्यवस्था : आमदार Adv. फुंडकर

खामगाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भाजप जिल्हाध्यक्ष,आमदार अॅड.आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून 40 बेडची अतिरिक्त व्यवस्था होणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने बेडची संख्या अपुरी पडत आहे.

    खामगाव (Khamgaon).  जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भाजप जिल्हाध्यक्ष,आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून 40 बेडची अतिरिक्त व्यवस्था होणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने बेडची संख्या अपुरी पडत आहे.

    ही परिस्थिती लक्षात घेऊन 10 दिवसापूर्वी आ. आकाश फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात बैठक घेऊन रुग्णालयात अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी दिला.

    22 रोजी बंगालमधून आल्यावर सामान्य रुग्णालयात त्यांनी रुग्णालय अधीक्षक डॉ.वानखडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली. तसेच सुरू असलेल्या विस्तारित जागेच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ.वानखडे, डॉ. निलेश टापरे, उद्योजक विपीन गांधी, पप्पू अग्रवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, नगरसेवक राकेश राणा, पवन गरड, गुणवंत खोडके उपस्थित होते.

    आठवड्यात आणखी निधी देणार
    येत्या आठवड्यात 40 बेडची व्यवस्था सामान्य रुग्णालयात होणार असल्याचे सांगून आ.आकाश फुंडकर यांनी या आठवड्यात आणखी निधी देणार असल्याचे आश्वासन दिले. दात्यांचाही सहभाग महत्वाचा राहिला. विपीन गांधी यांनी कोविड तपासणी स्वतंत्र प्रयोगशाळा उभाणीसाठी योगदान दिले. पाच सहा दानशूर व्यक्ती सहाय्य करण्यासाठी पुढे आले आहेत.