person arrested for selling illegal weapon in malkapur buldhana

मलकापूर (जि.बुलडाणा). येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात देशी बनावटीची पिस्तुल व एक जिवंत काडतूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींची झाडाझडती घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे एपीआय श्रीधर गुट्टे व एपीआय चंद्रकांत बांदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रतनसिंह बोराडे, जितेंद्र सपकाळे,समाधान ठाकूर, अनिल डागोरे, ईश्वर वाघ, शशिकांत शिंदे, गजानन काळवाघे, वसीम शेख, सलीम बरडे, योगेश जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून सागर संजय भंगाळे (२५) रा. सरस्वती नगर वरणगाव तालुका भुसावळ याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या जवळ दोन देशी बनावटीच्या पिस्तूल प्रत्येकी अंदाजे किंमत १५ हजार व १ जिवंत काडतूस अंदाजे ५०० रुपये, तसेच विना क्रमांकाची बजाज प्लेटिना मोटरसायकल किंमत अंदाजे ५० हजार रुपये असा ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा साथीदार संजय गोपाळ चंदेले ४५ रा. दर्यापूर यास अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत खामगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन मलकापूरचे प्रभारी अधिकारी व डीपी पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कारवाई केली.