attack with ax

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर(attack on ravikant tupkar`s office) यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाला आहे. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

बुलडाणा : देशभरात शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर(attack on ravikant tupkar`s office) यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाला आहे. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच सावळा गावातील जनार्दन गाडेकर या इसमाने हातात कुऱ्हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यकांमध्ये पडल्याने अनर्थ टळला. पण, झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत मार बसल्याची माहिती आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.