Gold Coins खरेदी करताना काळजी घ्या; बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला.

    बुलडाणा: सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करताना पैशांची समस्या नागरिकांना भेडसावत असते. यासाठी अनेक नागरिक हे सोन्याची नाणी (Gold coins) खरेदी करुन सोन्यात गुंतवणूक करत असतात. ॉ

    मात्र, याचाच फायदा घेत बनावट सोन्याची नाणी विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे बनावट सोन्याची नाणी (Fake Gold coins) विकणाऱ्या टोळीचा बुलडाण्यातील खामगाव पोलिसांनी (Khamgaon Buldhana Police) पर्दाफाश केला आहे.

    सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला.

    १५ लाखाच्या फसवणूक प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुरूवारी पहाटे खामगाव उपविभागीय पोलीस पथकाने अंत्रज गावाजवळील वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन राबविले आणि या टोळीचा पर्दाफाश केला आहे.