मोबाइलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलाला टोकले; संतापलेल्या मुलाने वडिलांचा केला खून

मोबाईलवर सारखं खेळण्यावर टोकणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केली (The son killed the father). कुऱ्हाडीने वार करुन पोटच्या मुलाने बँक अधिकारी वडिलांची हत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलगा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे.

    बुलढाणा (Buldhana).  मोबाईलवर सारखं खेळण्यावर टोकणाऱ्या वडिलांची मुलाने हत्या केली (The son killed the father). कुऱ्हाडीने वार करुन पोटच्या मुलाने बँक अधिकारी वडिलांची हत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलगा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे.

    गजानन संपत गवई असं मृत्युमुखी पडलेल्या 55 वर्षीय वडिलांचं नाव आहे. ते अमडापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील समतानगर परिसरात पत्नी आणि मुलासह राहत होते. त्यांचा 21 वर्षीय मुलगा शुभम इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. तर त्यांना चार विवाहित मुली आहेत.

    शुभमला सतत मोबाईल पाहण्याची, सोशल मीडियावर Active राहण्याची सवय होती. वडील शुभमला जास्त वेळ मोबाईल पाहू नकोस, अभ्यास कर यावरुन रागावत असत. मोबाईल पाहण्यावरुन दोघांमध्ये रविवारी पुन्हा वाद झाला. त्यानंतर शुभमने कुऱ्हाडीने वार करुन वडील गजानन गवई यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे समतानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    आरोपी मुलाला अटक
    आरोपी मुलगा शुभम गवईला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.