खामगाव मतदारसंघात ४४० जणांचे रक्तदान; रक्तदात्यांचा मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार

सध्या रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या पुढाकाराने 500 बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प केला होता.

    खामगाव (Khamgaon).  सध्या रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या पुढाकाराने 500 बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प केला होता. 1 मे पर्यंत 440 जणांनी रक्तदान केले. गरजेच्या वेळी रक्तदान केलेल्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही, असे दिलीपकुमार सानंदा म्हणाले.

    कोरोना संकटकाळात प्रत्येकाला जीवाची काळजी वाटत असतानासुध्दा कॉंग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व युवकांनी रक्तदानाच्या कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिरामध्ये माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, डॉ.सदानंद धनोकार, विजय काटोले, ज्ञानेश्वर पाटील, माजी जि.प.अध्यक्ष वर्षा वनारे, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, विठ्ठ्ल सोनटक्के, मनीष देशमुख, इनायतउल्ला खॉं,सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, पंजाबराव देशमुख, राजाराम काळणे उपस्थित होते. सुरुवातीला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते टॉवर चौकातील राजीव गांधी उद्यानातील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

    त्यानंतर तुकाराम महाराज सभागृहातील तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. दिग्विजयसिंह सानंदा, सपना वानखडे, प्रमिला वानखडे, सरपंच विनोद मिरगे, तुषार चंदेल, अमित भाकरे, मंगेश इंगळे, आनंद किलोलिया यांच्यासह जय भवानी मंडळ चांदमारी, शिवाजी व्यायाम मंदिर, राणा व्यायाम मंदिर, जगदंबा क्रीडा मंडळ, बाळापूर फैल, वीर हनुमान मंडळ, वायुनंदन मंडळ, शिवाजी नगर भागातील कॉंग्रेस कार्यकर्ते, अमरलक्ष्मी गणेश मंडळ, बालाजी प्लॉट, सुटाळपुरा, घाटपुरी नाका, लांजुळ, जलंब, माटरगाव, अटाळी, जानोरी, गणेशपूर, घाटपुरी,लाखनवाडा, कोलोरी, भंडारी, हिवरा बु. यासह अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कोविड नियमांचे पालन करण्यात आले.

    रक्तदात्यांचा मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येईल असे सानंदा यांनी सांगितले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ.मोहसीन खान, डॉ.वकार खान, डॉ.राजश्री पाटील, देशपांडे, सिस्टर चितारे, काळे, मेघा माघोदे, अशोक पराते,अन्सारभाई व सोनी ब्लड बँकेचे डॉ.गोपाल सोनी व सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक किशोरआप्पा भोसले व सुरेशसिंह तोमर यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार यांनी केले.