‘कोरोना बाधित’ होण्यासाठी ५ ते २० हजारात स्वॅब खरेदी केले; टोचूनही घेतले, कंपनीतील १६२ कर्मचारी कोरोना बाधित; घटनेमागील ‘कारण’ जाणून घ्या….

शासनाने नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी देशभरात कोरोना लसिकरण अभियान राबविले आहे. याला काॅर्पोरेट कंपन्यांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसिकरण केंद्रावर कोविशिल्ड, कोविड-19 लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कारण काय तर नागरिकांनी कोरोनामुक्त राहण्याची चिंता! मात्र, विदर्भात एक अशीही कंपनी आढळली आहे की यातील कर्मचाऱ्यांनी कोरोना व्हावा म्हणून चक्क ‘कोरोना स्वॅब’ असलेल्या लसी टोचून घेतल्या.

    बुलढाणा (Buldhana). शासनाने नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी देशभरात कोरोना लसिकरण अभियान राबविले आहे. याला काॅर्पोरेट कंपन्यांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसिकरण केंद्रावर कोविशिल्ड, कोविड-19 लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कारण काय तर नागरिकांनी कोरोनामुक्त राहण्याची चिंता!

    मात्र, विदर्भात एक अशीही कंपनी आढळली आहे की यातील कर्मचाऱ्यांनी कोरोना व्हावा म्हणून चक्क ‘कोरोना स्वॅब’ असलेल्या लसी टोचून घेतल्या. यामुळे 162 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. पोलिसांच्या पारखी नजरेतून हा प्रकार सुटू शकला नाही. त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर जे तथ्य समोर आले, ते जाणून पोलिसही चक्रावून गेले.

    खामगावातील एका कंपनीमधील ७००पैकी १६२ कर्मचारी मागील सव्वावर्षात करोनाबाधित आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यातील किती जणांनी स्वॅब विकत घेतले, हे पोलिस चौकशीत उघड होणार असल्याचे ठाणेदार अम्बुलकर यांनी सांगितले.

    एक लाखाचा विमा मिळविण्यासाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयातून एका कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी करोना पॉझिटिव्ह स्वॅब विकत घेतल्याचे समोर आले. कंत्राटी कक्षसेवक विजय राखोंडे याच्यासह कंपनीशी संबंधित चंद्रकांत उमाप या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यातील राखोंडे याला गुरुवारी पोलिस कोठडी मिळाली असून उमापला एका दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. पोलिस तक्रारीत एका स्वॅबसाठी पाच हजार रुपये घेतल्याचे नमूद असले तरी प्रत्यक्षात एका स्वॅबसाठी २० हजार रुपये घेण्यात आल्याची चर्चा आहे.