बुलडाण्यातील आरोग्य व्यवस्थेचा गाडा चालतो उसन्या इमारतीतुन

बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यलय कुठे पंचायत समिती कार्यालयातील एका खोलीत, तर मोताळा येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालय एका कर्मचाऱ्याच्या घराच्या एका खोलीत आहे. मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालय शव विच्छेदन गृहाच्या भिंतिला लागुन आहे. अश्या प्रकारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यलयांची बिकट परिस्थिति आहे.

    कोरोना काळात जनतेचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वात मोठे परिश्रम घेतले. पण, बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या महत्वाच्या अशा एकाही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला स्वतःची इमारत नाही की एकाही आरोग्य अधिकाऱ्याला स्वतंत्र शासकीय निवासस्थान नाही. कारण सर्वच तालुका आरोग्य कार्यालये एकतर एखाद्या शाळेत किंवा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी आहे.

    बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यलय  कुठे पंचायत समिती कार्यालयातील एका खोलीत, तर मोताळा येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालय एका कर्मचाऱ्याच्या घराच्या एका  खोलीत आहे. मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालय शव विच्छेदन गृहाच्या भिंतिला लागुन आहे. अश्या प्रकारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यलयांची बिकट परिस्थिति आहे.

    या संदर्भात बोलताना बुलढाणाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे म्हणाले की, “जिल्ह्यात एकूण १३ तालूका वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांना स्वतंत्र ऑफीस नाही हि वस्तुस्थिती आहे. सध्या तरी या आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र कार्यालया संदर्भात शासनाच्या कोणत्याही गाइडलाइन नाहीत. पण, आम्ही शासनाकडे स्वतंत्र ऑफीसची मागणी करु.”

    कोरोनाच्या दिड वर्षाच्या काळात सर्वात महत्वाचे काम तालुका वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेने केले आहे.  ग्रामीण पातळीवर ही यंत्रणा काम करते. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालया अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येत असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्वाचे काम सध्या ते करत आहेत. नागरिकांचे स्वॅब घेणे, कोविड कंम्प, लसिकरण, तपासणी मोहीम या सर्व पातळीवर हि यंत्रणा कार्य करीत आहे. त्यांच्या कामाचा लेखाजोगा या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यलयात बैठकीद्वारे घेतला जातो. मात्र, मीटिंग घेण्यासाठी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे.